Amitabh Bachchan greets Sudesh Bhosle - the brightest phase in Sudesh's life

सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास भेट, सुवर्ण काळाला दिला उजाळा गायक सुदेश भोसले यांचा स्वप्नपूर्ती करणारा उपक्रम नुकताच त्यांनी लाँच केला आहे. तो उपक्रम म्हणजे त्यांचा 'ग्रॅव्हिटी स्टुडिओज्', आणि यासाठी त्यांना त्यांच्या फॅन्स आणि इंडस्ट्री मधून अनेक शुभेच्छा देखील मिळत असून आता ह्या मध्ये अजून एक नाव जोडले गेलेले आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे. नुकतीच सुदेश भोसले व अमिताभ बच्चन यांची भेट जुहू येथील जनक येथे झाली.

ह्या भेटीबद्दलचा आनंद व्यक्त करत सुदेश जी म्हणाले की, "अमिताभजींशी भेट हा माझ्यासाठी मोठा सुखाचा प्रसंग होता. तसे, आम्ही नेहमीच कार्यक्रमांद्वारे भेटत असतो, परंतु बर्‍याच दिवसांनंतर मला त्यांच्याशी निवांत बोलण्याची संधी मिळाली." पुढे या भेटी बद्दल सांगताना ते म्हणाले की, "सुपरस्टार असूनही ते  माझ्या आणि माझ्या कार्यक्रमांबद्दल विचारपूस करण्यास विसरले नाही आणि विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांपासून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी न चुकता रात्री १२:०१ वाजता मला शुभेच्छा देणारे अमिताभ जी आहेत. मी माझी काही स्केचेस त्यांना दाखविली, आम्ही आयुष्याबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारल्या आणि हे असे क्षण आहेत जे मी आयुष्याभर जपेन. मी, अमिताभजींना माझ्या सुधारित स्टुडिओला भेट देण्याची आणि आमच्या संगीताच्या उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी येण्याची विनंती केलेली आहे. मी आशा करतो लवकरच माझ्या ग्रॅव्हिटी स्टुडिओज मध्ये माझी त्यांच्याशी पुन्हा माझी भेट होईल आणि या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे!" 

Read more Bollywood, Entertainment news at FILMYTOWN.com

सुदेश यांनी महान गायक किशोर कुमार यांच्याबरोबर गायले आहे आणि संजीव कुमारसाठी आवाज डब केले आहे. परंतु  पण १९९१ मध्ये 'हम' या चित्रपटात बच्चनसाठी 'जुम्मा चुम्मा दे दे' हे गीत गायले तेव्हापासून ख्याती मिळाली.

Comments